Skip to content

Welcome to Vilasrao Deshmukh Government Medical College, Latur

02382 253017

NEWS >>

Welcome to Vilasrao Deshmukh Government Medical College, Latur

HOSPITAL

Hospital Information

Feb 2025

 Daily Average OPD patient

1590

 Daily Average new Admissions

154

Avg Daily Total Admitted patients

626

 

बाह्यरुग्ण विभाग (OPD)

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर हे उच्च दर्जाचे तृतीय (Tertiary) आरोग्यसेवा केंद्र असून येथे रुग्णांना 24 तास अत्यावश्यक वैद्यकीय सेवा पुरविल्या जातात. त्यामुळे जिल्ह्यातील, जिल्ह्याबाहेरील व सीमालगत असलेल्या राज्यांतील रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात खूप मोठ्या प्रमाणात ये-जा असते. महिला, जेष्ठ नागरिक, दिव्यांग आणि गरोदर माता यांच्यासाठी स्वतंत्र नोंदणी कक्ष चालविला जातो. बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांना तज्ञ चिकित्सकांकडून रुग्णसेवा पुरविली जाते. तसेच आठवड्यातील “दर गुरुवारी थायरॉइड रुग्णांची मोफत तपासणी व उपचार केले जातात.” तसेच “स्तन कर्करोग बाबत तपासणी दैनंदिन केली जाते.”


अपघात विभाग

अपघात विभागात मदत कक्ष (Help Desk) तसेच Triage System सुरु केली आहे, ज्याद्वारे रुग्णांचे प्राध्यान्यक्रमानुसार वर्गीकरण करुन त्वरित आणि प्रभावी उपचार प्रदान केले जातात. Mass Casualty चा प्रसंग उद्भवल्यास परिस्थिती सुनिश्चितपणे कशी हाताळण्यात यावी जेणेकरुन रुग्णांना तातडीने उपचार मिळतील यासाठी वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली Standard Operating Procedure (SOP) तयार करण्यात आलेली आहे. पोलिस यंत्रणे मार्फत Gastric Lavage चे Sample हस्तांतरित करुन घेण्याबाबत CMO यांना येत असलेल्या अडचणी तसेच रुग्णालय व पोलिस यंत्रणा यांमध्ये समन्वय राहावा यासाठी मा. पोलीस अधीक्षक, लातूर यांच्या सोबत आपल्या कार्यालयामार्फत वेळोवेळी बैठका घेण्यात येतात व त्यामध्ये चर्चा होऊन पुढील कार्यवाही केली जाते.


पाकगृह

या रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या रुग्णांना पाकगृहामार्फत दैनंदिन आहार दिला जातो.नियमितपणे आहारामध्ये खालील प्रमाणे जिन्नस देण्यात  येतात.

सकाळी → चहा, नाष्टा (पोहे, मटकी, वाटाणा, हरभरा इत्यादींची उसळ)

दुपारचे जेवण → भाजी, चपाती, वरण, भातरात्रीचे जेवण → भाजी, चपाती, वरण, भात काही विशिष्ट रुग्णांना High Protein Diet दिला जातो. त्यामध्ये वरील नमूद आहारासोबतच दूध, अंडी आणि गुळ-शेंगदाण्यांचे लाडू दिले जातात. हा सर्व आहार विविध योजनेअंतर्गत (JSSK, NPCB,NTEP etc.) आणि पिवळी शिधापत्रिका धारक  रुग्णांना विनामुल्य दिला जातो आणि इतर रुग्णांना प्रतिदिन केवळ ₹20 मुल्य स्विकारुन पूर्ण आहार दिला जातो